Dream Car Deal: दिवाळीत नवीन कार घ्यायची आहे? आधी बजेट आणि EMI तपासा..

दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि नव्या स्वप्नांची सुरुवात.. या सणाच्या काळात अनेक कुटुंबं नवीन कार खरेदी करण्याचा विचार करतात. वाहन कंपन्या आणि डीलर्सकडूनही आकर्षक सणासुदीच्या ऑफर्सही दिल्या जातात. मात्र, ऑफर आकर्षक आहे म्हणून लगेच निर्णय घेण्याऐवजी आपल्या आर्थिक क्षमतेचा विचार करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही कार घ्यायचा विचार करत असल्यास हा लेख तुमच्यासाठीच आहे..

कार खरेदीपूर्वी बजेट निश्चित करा

कारची किंमत ठरवताना केवळ शोरूममधील किंमत लक्षात घेऊ नका. ऑन-रोड किंमत, विमा, नोंदणी शुल्क, सर्व्हिसिंग, पार्किंग आणि मासिक EMI यांचाही विचार करा. त्याचबरोबर कारचा हप्ता भरल्यानंतर घरखर्च, इतर कर्जांचे हप्ते आणि इमर्जन्सीसाठी पुरेशी रक्कम शिल्लक राहील, याची खात्री करा.

कार लोन घेताना व्याजदर आणि अटी समजून घ्या

कार लोन निवडताना फक्त आकर्षक व्याजदर किंवा कमी EMI पाहून निर्णय घेऊ नका. कर्जाचा कालावधी, प्रक्रिया शुल्क, विलंब शुल्क, मुदतपूर्व परतफेडीचे नियम आणि एकूण परतफेडीची रक्कम तपासा. कमी EMI मिळावी म्हणून कर्जाचा कालावधी वाढवल्यास एकूण व्याजाचा खर्च वाढू शकतो. त्यामुळे आपल्या उत्पन्नाला आणि आर्थिक उद्दिष्टांना अनुरूप कर्ज निवडणं महत्त्वाचं आहे.

कार लोनची EMI आधीच मोजून पाहा

कार बुक करण्यापूर्वी EMI कॅल्क्युलेटरच्या मदतीने वेगवेगळ्या कर्जरकमांचा व्याजदर आणि कालावधींसाठी हप्त्यांचा अंदाज घ्या.

  • डाउन पेमेंट वाढवल्यास EMI किती कमी होईल?
  • कमी कालावधी निवडल्यास एकूण व्याज किती भरावं लागेल?
  • कारचा हप्ता भरल्यानंतर मासिक बचत किती शिल्लक राहील?

या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यास कार खरेदीचा निर्णय अधिक विचारपूर्वक घेता येतो. तसेच, आपल्याला महिन्याच्या खर्चांचा अंदाज यायलाही मदत होईल.

कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तयारी करा

कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी उत्पन्नाची कागदपत्रं, बँक स्टेटमेंट, ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा तयार ठेवा. कर्ज देणाऱ्या संस्थेच्या नियमानुसार इतर कागदपत्रांचीही आवश्यकता असू शकते. आपला क्रेडिट इतिहास तपासा आणि आर्थिक माहिती अचूक असल्याची खात्री करा. यामुळे कर्जासाठी अर्ज करताना अनावश्यक अडचणी कमी होण्यास मदत होऊ शकते.

दिवाळीचा खर्च आणि भविष्यातील गरजा यांचा समतोल साधा

दिवाळीच्या काळात खरेदी, भेटवस्तू, सजावट आणि कौटुंबिक समारंभांवर खर्च वाढू शकतो. त्यामुळे कारसाठी संपूर्ण बचत खर्च करू नका. इमर्जन्सीसाठी काही रक्कम बाजूला ठेवा आणि भविष्यातील EMI वेळेवर भरता येईल, याचं नियोजन करा. कारण, एखादा हप्ता थकला किंवा हप्ते भरायला उशीर झाला तर दंड भरावा लागू शकतो.

कामाची गोष्ट

कार ही केवळ प्रवासाची सोय नसून दीर्घकालीन आर्थिक जबाबदारीही आहे. त्यामुळे दिवाळीच्या ऑफर्सचा लाभ घेताना आपल्या उत्पन्नाचा, बचतीचा आणि परतफेडीच्या क्षमतेचा विचार करा. तसेच, तुम्हाला परवडणारे वाहन कर्ज हवे असल्यास, आजच व्यंकटेश मल्टीस्टेटच्या शाखेशी 1800 5322 111 या क्रमांकावर संपर्क करा किंवा आपल्या जवळच्या शाखेला भेट द्या.. आणि या दिवाळीत तुमच्या हक्काची नवीन कार घरी येऊन या..